दादर-हुबळी एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादर-हुबळी एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ
दादर-हुबळी एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ

दादर-हुबळी एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक गर्दी लक्षात घेऊन दादर ते हुबळी एक्स्प्रेसच्या डब्यातील तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ट्रेन क्रमांक १७३१८/१७३१७ दादर-हुबळी-दादर एक्स्प्रेसला १ नोव्हेंबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत दादर येथून आणि ३१ ऑक्टोबर २०२२ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत हुबळी येथून एक प्रथम वातानुकूलित डब्बा तात्पुरता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दादर-हुबळी एक्स्प्रेसला एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन असणार आहे.