आदिवासी समाजासोबत पालिकेच्या जलविभागाची दिवाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी समाजासोबत पालिकेच्या जलविभागाची दिवाळी
आदिवासी समाजासोबत पालिकेच्या जलविभागाची दिवाळी

आदिवासी समाजासोबत पालिकेच्या जलविभागाची दिवाळी

sakal_logo
By

आदिवासी समाजासोबत
पालिका जल विभागाची दिवाळी
मुंबई, ता. २९ ः आपल्या दैनंदिन कामासोबतच सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्यासाठी पालिकेच्या जल विभागाच्या टीमने पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या उपजल अभियंता (प्रचालन) विभागाने आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून एक नवा पायंडा पाडला. महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय क्षेत्रातील आदिवासी बांधवांसह टीमने दिवाळी साजरी केली. महत्त्वाचे म्हणजे, आठ वर्षांपासून टीमने सातत्याने आदिवासी बांधवांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 
पालिकेच्या जल विभागाने आदिवासी बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने शिधा उपलब्ध करून देतानाच  बच्चे कंपनीसाठीही खेळणी वितरित केली. या वेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी महिला उपस्थित होत्या. खेळणी हातात पडताच लहान मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पालिकेच्या महिला अधिकारी आणि कर्मचारीवर्गानेही मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आनंद लुटला.