लठ्ठपणामुळे सतावतेय गुडघेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लठ्ठपणामुळे सतावतेय गुडघेदुखी
लठ्ठपणामुळे सतावतेय गुडघेदुखी

लठ्ठपणामुळे सतावतेय गुडघेदुखी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : स्थुल आणि अतिरिक्त वजन असलेल्या रुग्णांमध्ये गुडघ्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. लठ्ठपणामुळे हाडे आणि सांध्यांच्या समस्या, अस्थिभंग आणि शेवटी ऑस्टियोआर्थरायटिस होतो. आहार आणि व्यायामाव्यतिरिक्त वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया (बॅरिएट्रिक) ही गुडघ्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या लठ्ठ रुग्णांना फायदेशीर ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

मुंबईत राहणाऱ्या अनामिका शर्मा (नावात बदल) ही ५० वर्षीय महिला लठ्ठपणासारख्या आजाराने ग्रासली होती. तिचा बीएमआय ३७.५; तर वजन ९६ किलो इतके होते. या महिलेला थायरॉईड आणि ऑस्टियोआर्थरायटिससारख्या समस्या होत्या. तिला गुडघा बदलण्याचा शस्त्रक्रियेचा (टीकेआर) सल्ला देण्यात आला. बेरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर तिचे वजन कमी झाले आणि तिच्या आरोग्याच्या सर्व समस्या दूर होऊ लागल्या. असे बरेच रुग्ण आहेत ज्यांना लठ्ठपणा आणि त्याच्याशी निगडित इतर आरोग्याच्या समस्येमुळे खूप त्रास होतो.

चीफ बॅरिएट्रिक सर्जन डॉ. मनीष मोटवानी यांनी सांगितले की, लठ्ठपणात ऑस्टियोआर्थरायटिस सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आजार आहे. ऑस्टियोआर्थरायटिस कॉमॉर्बिडिटी आहे. ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये शरीराचे अतिरिक्त वजन वाढल्याने सांध्यांवर हानिकारक भार निर्माण होतो. गेल्या दोन वर्षांत ४० वर्षांवरील २ हजार ओपीडी रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांनी गुडघेदुखीची तक्रार केली आहे. ज्या रुग्णांनी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया केली होती त्यांच्या गुडघाप्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या यशाचा दर वाढला आहे. डॉ. मोटवानी म्हणाले की, शरीराचे वजन फक्त १० टक्के कमी केल्याने संधिवाताच्या वेदना निम्म्याने कमी होऊ शकतात.