बेलापूरात २३ लाखांची घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेलापूरात २३ लाखांची घरफोडी
बेलापूरात २३ लाखांची घरफोडी

बेलापूरात २३ लाखांची घरफोडी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : दिवाळीनिमित्त मुलाच्या घरी गेलेल्या सी.बी.डी बेलापूरमधील वृद्ध दाम्पत्याचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यांच्या घरातील रोख रकमेसह ५६ तोळे सोन्याचे व २० तोळे चांदीचे दागिने असा तब्बल २३ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
सी.बी.डी बेलापूर सेक्टर-१४ मधील प्रोग्रेसिव्ह आर्केड इमारतीत गुरदयाल सिंह हे पत्नी व मुलीसह राहण्यास आहेत, तर त्यांचा मुलगा पत्नी व मुलासह खारघर येथे राहण्यास आहे. दिवाळी असल्याने सिंह दाम्पत्य २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आपल्या मुलीसह खारघरमध्ये राहणाऱ्या मुलाकडे गेले होते. या दरम्यान सिंह यांचे घर बंद असल्याने अज्ञात चोरट्याने सिंह यांच्या घराचा सेफ्टी दरवाजा तोडून घरातील दोन्ही कपाटांतील तब्बल २३ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. २५ ऑक्टोबर रोजी सिंह दाम्पत्य घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी एनआरआय सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.