तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिन्ही रेल्वे मार्गावर 
रविवारी मेगाब्लॉक!
तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक!

तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक!

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ३०) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाऊन, तसेच पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे ः माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी ः सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंडदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ठाण्यापासून या जलद गाड्या पुनश्च डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यापुढे त्या अप जलद मार्गावर वळवल्या जातील.
..........
हार्बर रेल्वे
कुठे ः कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी ः सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकरिता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी असेल.
............
पश्चिम रेल्वे
कुठे ः गोरेगाव ते सांताक्रूझ अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर
कधी ः रात्री १२.२५ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉकदरम्यान डाऊन दिशेच्या सर्व जलद गाड्या गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर धावणार आहेत, तर अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल सेवा गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान अप जलद मार्गावर धावणार आहेत. सर्व धीम्या उपनगरीय सेवांना विलेपार्ले स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाणार आहे.