निर्माते कमल किशोर मिश्रा यांना अखेर अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्माते कमल किशोर 
मिश्रा यांना अखेर अटक
निर्माते कमल किशोर मिश्रा यांना अखेर अटक

निर्माते कमल किशोर मिश्रा यांना अखेर अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : पत्नीला कारने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात प्रसिद्ध चित्रपट निर्माते कमलकिशोर मिश्रा यांना आंबोली पोलिसांकडून अटक करण्यात आली. मिश्रा यांची पत्नी यास्मिन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मिश्रा हे त्यांच्या कारमध्ये एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळले होते. मिश्रा यांच्या पत्नीने कारची काच खाली करण्यास सांगितले असता, त्यांनी कारने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता मिश्रा यांनी यास्मिन यांना कारने धडक दिली. या घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. यास्मिन यांच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी मिश्रा यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली.