नोटांवर डॉ. बाबासाहेबांचे छायाचित्र हवे; आठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athwale
नोटांवर डॉ. बाबासाहेबांचे छायाचित्र हवे : आठवले

नोटांवर डॉ. बाबासाहेबांचे छायाचित्र हवे; आठवले

मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र भारतीय चलनी नोटांवर असायला हवे, अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. नोटांवर डॉ. बाबसाहेबांचे छायाचित्र असावे, ही देशभरातील दलित बहुजन आंबेडकरी जनतेची मागणी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची निर्मिती डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथावर आधारित आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे महान अर्थतज्ज्ञ होते. राष्ट्रउभारणीच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चलनी नोटांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असावे, अशी आग्रही मागणी आठवले यांनी केली आहे.