राज्यातील पोलिस भरतीला अखेर मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील पोलिस भरतीला अखेर मुहूर्त
राज्यातील पोलिस भरतीला अखेर मुहूर्त

राज्यातील पोलिस भरतीला अखेर मुहूर्त

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : राज्यातील बहुप्रतीक्षित पोलिस भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला असून तीन नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सुमारे १४,९५६ पदांसाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेची एक नोव्हेंबरला जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सूचना पोलिस महासंचालकाकडून सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
राज्यात जवळपास पोलिस शिपायांची सुमारे १४,९५६ पदे भरली जाणार आहे. तसेच राज्य राखीव पोलिस दल व पोलिस वाहनचालक यांचीही स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याच वेळी सुरू होणार आहे. त्यामुळे जागांमध्ये काही बदल होऊ शकतो. पोलिस शिपाई पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच २७ दिवस असेल. अधिक माहितीसाठी उमेदवाराने policerecruitment२०२२.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
---
शारीरिक परीक्षेनंतर लेखी परीक्षा
२०१९ पासून पोलिस भरती प्रक्रिया खोळंबली होती. शिपाई पदांसाठी होणाऱ्या या भरतीमध्ये प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेतही किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार आहे.