ज्येष्ठ दिग्दर्शक शिवकुमार खुराना यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ दिग्दर्शक शिवकुमार खुराना यांचे निधन
ज्येष्ठ दिग्दर्शक शिवकुमार खुराना यांचे निधन

ज्येष्ठ दिग्दर्शक शिवकुमार खुराना यांचे निधन

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : सत्तर-ऐंशीच्या दशकातील नामांकित सिने दिग्दर्शक-निर्माते शिवकुमार खुराना (वय ८३) यांचे गुरुवारी (ता. २७) निधन झाले. मुंबईतील ब्रह्माकुमारी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंधेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते.

बदनाम, बदनसीब, बे आबरू, सोने की जंजीर, इंतकाम की आग अशा सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन खुराना यांनी केले आहे. बॉलीवूडचे हँडसम हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनोद खन्ना यांना नायक म्हणून पहिली संधी शिवकुमार खुराना यांनीच दिली. खलनायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या विनोद खन्नांना त्यांनी ‘हम तुम और वो’ या सिनेमातून नायक म्हणून प्रेक्षकांसमोर आणले. तब्बल ३५ वर्षे खुराना यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली. त्याकाळच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले. अशोक कुमार, संजीव कुमार, विनोद मेहरा, जॉय मुखर्जी, फिरोज खान या अग्रणी अभिनेत्यांसोबत त्यांनी चित्रपट केले. खुराना यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीने एक जुन्या पिढीतील यशस्वी दिग्दर्शक गमावल्याचे बोलले जात आहे.