कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद
कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद

कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद

sakal_logo
By

ठाणे, ता. २९ (वार्ताहर) : कोपरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. या पुलावर आनंदनगर सब-वे येथे लोखंडी गर्डर टाकण्यासाठी वाहतूक विभागाने शनिवारी रात्री ते रविवारी रात्री दरम्यान कोपरी पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे शहरातून जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली.

शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत आणि रविवारी रात्री ११ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कोपरी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ठाण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले. ठाणे शहरातून पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला. घोडबंदर मार्गावरून ठाण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना माजिवडा ब्रिजवर उजवे वळण घेण्यास व गोल्डन क्रॉस माजिवडा ब्रिजखाली प्रवेश बंद करण्यात आला आहे.