टॅक्सीतील मागच्या आसनावरील प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करू नये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टॅक्सीतील मागच्या आसनावरील प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करू नये
टॅक्सीतील मागच्या आसनावरील प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करू नये

टॅक्सीतील मागच्या आसनावरील प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करू नये

sakal_logo
By

‘मागील आसनावरील प्रवाशांना
सीट बेल्टची सक्ती नको’
टॅक्सी मेन्स युनियनचे वाहतूक पोलिसांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत मागील आसनावरील प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आले आहे. सीट बेल्ट न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्याचे आदेशही मुंबई वाहतूक पोलिस सहआयुक्तांनी काढले आहेत. मात्र, मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने त्यावर हरकत नोंदवली आहे. टॅक्सीतील मागील आसनावरील प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. अनेक मागण्यांचे पत्र वाहतूक पोलिस सह आयुक्तांना देण्यात आले आहे.
टॅक्सी बहुतांश महापालिका हद्दीत चालतात. एमएमआरडीएच्या मर्यादेत टॅक्सी चालवण्यास परवानगी आहे. बहुतांश प्रवासी कमी अंतरासाठी प्रवास करतात. टॅक्सींना चार प्रवासी वाहून नेण्याची परवानगी आहे. टॅक्सीमध्ये मागील आसनावर सीट बेल्ट सुविधा आहे. तिसऱ्या प्रवाशाला मात्र सीट बेल्ट वापरण्याची सुविधा मिळत नाही. त्यामुळे पोलिसांनी खासगी गाड्यांची तुलना टॅक्सीशी करू नये, अशी मागणी युनियनने केली आहे. टॅक्सीच्या अपघाताचे प्रमाण अत्यंत किरकोळ आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

अवघा १२ किमी वेग!
शहराच्या हद्दीतील वाहनांचा सरासरी वेग १२ किलोमीटरपेक्षा कमी असतो. अशा परिस्थितीत मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट घालणे शक्य नाही. त्यामुळे मुंबई महानगरातील टॅक्सी वाहनांना केंद्रीय मोटार वाहन कायदा लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी केली आहे.