वसईत दीपसंध्याने रसिक मंत्रमुग्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत दीपसंध्याने रसिक मंत्रमुग्ध
वसईत दीपसंध्याने रसिक मंत्रमुग्ध

वसईत दीपसंध्याने रसिक मंत्रमुग्ध

sakal_logo
By

विरार, ता. २९ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका आणि डॉ. धोंडो गोविंद अभ्यंकर स्मृती वाचनालयातर्फे पारनाका येथील शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजाचे अनंतराव ठाकूर नाट्यगृहात दीपसंध्या या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस, माजी महापौर प्रवीण शेट्टी, फा. स्टीफन घोन्सालवीस, गायक कलाकार अजित परब व निवेदक विघ्नेश जोशी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनानंतर अजित परब यांच्या ‘सूर निरागस हो’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गायक अजित परब, राधिका नांदे, जय आजगावकर, निरुपमा डे यांसह चिमुकली लिटल चॅम्प स्वरा जोशी यांनी भक्तिगीते, भावगीते, हिंदी चित्रपट गीते, लावणी, गोंधळ अशी गाणी सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमासाठी वसईतील अनेक माजी लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकाऱ्यांसह वसईतील मान्यवर रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश वनमाळी यांनी सर्वांचे आभार मानताना प्रशासकीय काळात प्रत्येक सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी भक्कम पाठिंबा देणारे वविश महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांचे आभार मानले. तसेच या सर्व उपक्रमांचे प्रेरणास्थान आमदार हितेंद्र ठाकूर यांना धन्यवाद दिले.