परतीच्या पावसामुळे अंजिराचा हंगाम लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परतीच्या पावसामुळे अंजिराचा हंगाम लांबणीवर
परतीच्या पावसामुळे अंजिराचा हंगाम लांबणीवर

परतीच्या पावसामुळे अंजिराचा हंगाम लांबणीवर

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ३० (बातमीदार) : परतीच्या पावसामुळे अंजिराचा हंगाम लांबला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबरच्या सुरुवातीस अंजीर फळ हा बाजारात दाखल होते. मात्र, सततच्या परतीच्या पावसामुळे अंजीर फळाच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पावसामुळे सुरुवातीच्‍या तोडणीला आलेल्या अंजिराचे नुकसान झाले. अंजीर फळाच्या उत्पादनाला थंड वातावरणात अधिक भर येतो. गेल्या कित्येक दिवसापासून ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्‍याने वातावरणामध्ये बदल होतो. त्याचा परिणाम हा अंजिर फळाच्या उत्पादनावर झाला आहे. आता दोन ते तीन दिवसापासून थंडी जाणवत आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत अंजिराची आवक वाढण्यास सुरुवात होईल, असे विक्रेता लकी मेहता यांनी सांगितले.