मढ जेट्टी येथे मोठा साप आढळल्याने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मढ जेट्टी येथे मोठा साप आढळल्याने खळबळ
मढ जेट्टी येथे मोठा साप आढळल्याने खळबळ

मढ जेट्टी येथे मोठा साप आढळल्याने खळबळ

sakal_logo
By

मालाड, ता. २९ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मढ जेट्टी येथे साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. मढ जेट्टी येथे नागरिकांची वर्दळ असते, तसेच हजारो प्रवासी बोटीने मढ ते वर्सोवा ये-जा करत असतात. त्यामुळे रहदारीच्या परिसरात अचानक साप आढळल्याने परिसरातील नागरिक, तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. साप दिसताच तेथील स्थानिक मासेमारी करणाऱ्यांनी याची माहिती सर्पमित्र रॉक्सन कोळी यांना दिली. कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत धामण जातीच्या सापाला पकडले. तसेच उपस्थित बघ्यांना धामण सापाबाबत माहिती दिली की, या जातींचे साप विषारी नाहीत. त्यामुळे घाबरण्याची भीती नाही. सर्पमित्र रॉक्सन हे मढ परिसरातील सापांना जीवदान देत त्यांना पकडून त्यांची जंगलात सुटका करतात.