विक्रमगडमध्ये हळव्या भात कापणीला जोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये हळव्या भात कापणीला जोर
विक्रमगडमध्ये हळव्या भात कापणीला जोर

विक्रमगडमध्ये हळव्या भात कापणीला जोर

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २९ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता, पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप घेतल्याने तालुक्यात हळव्या भातपिकाच्या कापणीला जोमाने सुरुवात झाली आहे. यंदा तालुक्यात ७,५५८ हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात आली आहे. सध्या विक्रमगडसह आंबेघर, बालापूर, दादडे, शेलपाडा, खडकी, सारशी, अंधेरी, ओंदे आदी भागातील शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरुवात केली आहे.