अमेरिकेच्या दहशतवादपूरक भूमिकेविरोधात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेच्या दहशतवादपूरक भूमिकेविरोधात आंदोलन
अमेरिकेच्या दहशतवादपूरक भूमिकेविरोधात आंदोलन

अमेरिकेच्या दहशतवादपूरक भूमिकेविरोधात आंदोलन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबादेवी, ता. २९ (बातमीदार) : अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी ८ सप्टेंबर २०२२ रोजी पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांसाठी ४५ कोटी डॉलरची आर्थिक मदत करण्याच्या दहशतवादपुरस्कृत निर्णयाला विरोध करून भारतीय बाजारपेठेतील अमेरिकन वस्तूंवर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी वीर योद्धा संघटनेने आझाद मैदानावर अमेरिका आणि पाकिस्तानविरोधात आक्रमक होत घोषणाबाजी केली. याच वेळी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी आवाहन करण्यात आले.
अमेरिकेच्या भूमिकेविरोधात मुंबईतील आझाद मैदान येथे या जनआंदोलनांचा आरंभ झाला असून वीर योद्धा संघटना महाराष्ट्रातील गाव पातळीपासून प्रत्येक जिल्ह्यात, शहरात आंदोलनाची धग पोहोचवेल, असे राज्यप्रमुख श्रीकांत रांजनकर यांनी सांगितले. रांजनकर यांनी या वेळी सांगितले की, ‘जगभरातील दहशतवाद आणि पाकिस्तान यांचा थेट संबंध असल्याचे ९/११, २६/११च्या दहशतवादी हल्ल्यांनी सिद्ध झाले आहे. शिवाय हे तेच एफ १६ विमान आहे, ज्याच्या मदतीने पाकिस्तानने बालाघाट हवाई हल्ला घडवून आणला होता. अशा परिस्थितीत यांसारख्या लढाऊ विमानासाठी आर्थिक पाठबळ देऊन अमेरिका थेट दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची आमची भावना झाली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका व पाकिस्तानच्या या करारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यावर अमेरिकेचे सहायक संरक्षण मंत्री एली रैटनर म्हणतात की, पाकिस्तानला मदत ही अमेरिकेच्या फायद्यासाठी केली आहे. यात भारताचा काहीही संबंध नाही.’


अमेरिकेतील वस्तूंवर बंदीची मागणी
---------------------------------------
रांजनकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, समस्त भारतीयांच्या भावना लक्षात घेता आपण अमेरिकेतील ज्या वस्तू बाजारपेठेत विकल्या जात आहेत. त्या सर्व वस्तूंवर बंदी घालावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच अमेरिकेने पाकिस्तानबाबत स्वार्थासाठी अर्थपूर्ण घेतलेल्या भूमिकेचा आपण भारतीय व हिंदू राष्ट्र म्हणून निषेध करीत असून या भूमिकेच्याविरोधात संपूर्ण राज्यभरातून अमेरिकेच्या वस्तूंवर बहिष्कार घालावा, यासाठी मोठे जनआंदोलन पुकारले आहे, असे रांजनकरांनी या वेळी सांगितले.