अंधेरीत भव्‍य कोकण महोत्‍सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधेरीत भव्‍य कोकण महोत्‍सव
अंधेरीत भव्‍य कोकण महोत्‍सव

अंधेरीत भव्‍य कोकण महोत्‍सव

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. २९ (बातमीदार) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्‍कृत व युवा प्रतिष्ठानकडून भव्‍य कोकण महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. युवा सेना विधानसभेचे चिटणीस अमोल भिंगार्डे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सुभाष मांजरेकर व माजी नगरसेवक शैलेश परब, नगरसेविका शिवानी परब यांचे विशेष सहकार्य लाभले असून आमदार रवींद्र वायकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे. अंधेरी पूर्वेतील पंप हाऊसच्‍या पंजाब नॅशनल बॅंकेशेजारील रोमेल मैदान येथे रविवारी (६ नोव्‍हेंबर) पर्यत रात्री ८ ते १० या वेळेत होणाऱ्या भव्‍य कोकण महोत्‍सवात कोकणातील खाद्य पदार्थांबरोबर व इतर पदार्थांची चवही चाखता येणार असून बच्‍चे कंपनी व मोठ्यांसाठी विविध कोकणी कार्यक्रमांची रेलचेलही असणार आहे. यात दशावतार नाटक, महाराष्ट्रातील लोकधारा, साईलीला, हिंदी-मराठी गाण्ं‍याच्या कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. या कोकण महोत्‍सवाची सांगता रविवारी (६ नोव्‍हेंबर) होणार आहे.