आधारभूत भात विक्रीच्या नोंदणीला मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधारभूत भात विक्रीच्या नोंदणीला मुदतवाढ
आधारभूत भात विक्रीच्या नोंदणीला मुदतवाढ

आधारभूत भात विक्रीच्या नोंदणीला मुदतवाढ

sakal_logo
By

अलिबाग, ता. २९ : खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीला १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोंदणी पूर्ण झाली नसल्याचे दिसून आले आहे. चालू पणन हंगामामध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकऱ्यांना ही मुदतवाढ देण्यात आली. शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा सातबारा, चालू बँक खाते व आधार कार्ड यासह आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता खरेदी केंद्रावर स्वत: नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके व जिल्हा पणन अधिकारी केशव ताटे यांनी केले आहे.