आसुडगांव येथील इंटरनेट बारवर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आसुडगांव येथील इंटरनेट बारवर छापा
आसुडगांव येथील इंटरनेट बारवर छापा

आसुडगांव येथील इंटरनेट बारवर छापा

sakal_logo
By

पनवेल, ता. २९ (वार्ताहर) : खांदा कॉलनी आसूडगाव सेक्टर-४ मधील इंटरनेट बार ॲण्ड रेस्टॉरन्टवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून महिला वेटर व ग्राहक अशा एकूण ४९ जणांना ताब्यात घेतले. इंटरनेट बार ॲण्ड रेस्टॉरन्टमध्ये बेकायदा कृत्य सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सहायक पोलिस आयुक्त शैलेश पासलवाड यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला सदर बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास छापा मारला. यावेळी सदर बारमध्ये महिला वेटरकडून अश्लील हावभाव व अंगविक्षेप करून ग्राहकांना आकर्षित करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी बारमधील २२ महिला वेटर, २० ग्राहक, सात पुरुष वेटर, मालक आणि मॅनेजर अशा एकूण ४९ जणांना ताब्यात घेतले. खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.