आयुक्तांचा फोटो वापरून फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्तांचा फोटो वापरून फसवणूक
आयुक्तांचा फोटो वापरून फसवणूक

आयुक्तांचा फोटो वापरून फसवणूक

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या फोटोचा वापर करून ‘गुगल पे’वर गिफ्ट कार्डची मागणी करण्याचा प्रकार समोर आला आहे. एका सहायक आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आली असून सहायक आयुक्तांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. असाच प्रकार आणखी काही पालिका अधिकाऱ्यांसोबतही घडला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्ह्याची नोंद झाली आहे. पालिका सहायक आयुक्त विश्वास शंकरवार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. शंकरवार यांना बुधवारी दुपारी अशा प्रकारचा संदेश मिळाल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्याशिवाय आणखी दोन अधिकाऱ्यांनाही अशाच प्रकारचे संदेश मिळाले आहेत.