‘वंदे भारत’ची बैलाला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वंदे भारत’ची बैलाला धडक
‘वंदे भारत’ची बैलाला धडक

‘वंदे भारत’ची बैलाला धडक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसने शनिवारी (ता. २९) सकाळी बैलाला जोरदार धडक दिली. या अपघातात वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या समोरील भागाचे नुकसान झाले असून अर्धा तास एक्स्प्रेसच्या खोळंबा झाला. वंदे भारत एक्स्प्रेसबाबत अपघाताची महिनाभरातील ही तिसरी घटना आहे.
भारतातील सर्वांत आधुनिक आणि नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज, नवीन पिढीच्या हायस्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला शनिवारी सकाळी ८.१५ वाजता अपघात झाला. ही एक्स्प्रेस अहमदाबादहून मुंबईला येत होती. गुजरातच्या अतुल स्थानकाजवळ बैलांचा कळप रेल्वे मार्गावर आला असता एक्स्प्रेसने एका बैलाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचा पुढील भाग तुटला असून मोठे नुकसान झाले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तुटलेला भाग काढून गाडीत ठेवला. त्यानंतर एक्स्प्रेस पुन्हा आपल्या नियोजित स्थळी मार्गस्थ करण्यात आली. या अपघातानंतर ट्रेन २० मिनिटे थांबवावी लागली होती.
...
महिन्याभरात तिसरी घटना
६ ऑक्टोबरला या गाडीने वटवा ते मणिनगर स्थानकाजवळ म्हशींना जोरदार धडक दिली. या धडकेत चार म्हशी ठार झाल्या होत्या. दुसरी घटनाही ८ ऑक्टोबरला घडली. कंझरी ते आणंद दरम्यान एक गाय रेल्वे रुळावर आल्याने त्यांच्यात धडक झाली. या धडकेतसुद्धा वंदे भारत एक्स्प्रेस गाडीचा पुढील भाग तुटला होता. आज तिसरी घटना घडली.