महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : घरातील भांडणामुळे मुंबईतील लोखंडवाला परिसरातील नाल्यात ४० वर्षीय महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे घटली. वेळीच पोलिसांच्या पथकाने महिलेला नाल्याबाहेर काढल्याने तिचे प्राण वाचले.
ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोखंडवाला परिसरातील नाल्यात पडून मदतीसाठी ओरडणाऱ्या एका महिलेबद्दल स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्याप्रमाणे ओशिवरा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आले आणि पाण्यात उतरून महिलेला वाचवले. महिलेला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घरातील काही समस्यांमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. महिला अंधेरीतील न्यू म्हाडा कॉलनी येथील रहिवासी आहे. महिलेचे समुपदेशन करण्यात आले असून तिला घरी जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.