अंबरनाथ तालुक्यात अजगराची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथ तालुक्यात अजगराची हत्या
अंबरनाथ तालुक्यात अजगराची हत्या

अंबरनाथ तालुक्यात अजगराची हत्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : अंबरनाथ तालुक्यात एका अजगराची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल करत संशयितांची चौकशी सुरू केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात उसाटणे गावातील खोणी तळोजा महामार्गाच्या बाजूला रविवारी सकाळी एक अजगर मेलेल्या अवस्थेत आढळले. दुसरीकडे याच अजगराची हत्‍या करून इथे टाकल्यानंतरचे काही फोटो सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल झाले आहेत. या अजगराचे डोके ठेचून हत्या करण्यात आल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पाहणी आणि पंचनामा केला. यानंतर अजगराची हत्या करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांची चौकशी वनविभागाकडून केली जात आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वन अधिकारी विवेक नातू यांनी दिली आहे.