गोरेगावमध्‍ये घाणीचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोरेगावमध्‍ये घाणीचे साम्राज्य
गोरेगावमध्‍ये घाणीचे साम्राज्य

गोरेगावमध्‍ये घाणीचे साम्राज्य

sakal_logo
By

गोरेगाव, ता. ३० (बातमीदार) : गोरेगावमध्‍ये घाणीचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी कचरा उघड्यावर फेकला जातो. अजूनही काही भागांत कचरापेट्या लावण्यात आलेल्या नाहीत. त्‍यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत असून प्रशासनाने ठोस उपाय करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्‍यान नागरिक उघड्यावर कचरा फेकत असल्‍याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. विशेष करून गोरेगाव पूर्वेला अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे अजूनही उघड्यावर कचरा टाकण्यात येतो. वालभट्ट रोड येथे औद्यगिक इमारतींना खेटूनच मोठी कचरापेटी आहे, ती नेहमी एवढी भरते की अर्धा रस्ता कचऱ्याने व्यापून गेलेला असतो. गणेशनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन करण्यात आले आहे आणि काही घरे अजून तोडायची राहिली आहेत, तेथेही कचऱ्याची पेटी बसवण्यात आलेली नाही. तसेच ओरेकलसारख्या कंपनीसमोर अशोक नगरच्या येथेही कचरा असाच फेकला जातो. त्‍यामुळे येथेही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पालिकेने त्‍वरित यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.