मुलभूत समस्या सोडवण्यासाठी मनसेचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलभूत समस्या सोडवण्यासाठी मनसेचे निवेदन
मुलभूत समस्या सोडवण्यासाठी मनसेचे निवेदन

मुलभूत समस्या सोडवण्यासाठी मनसेचे निवेदन

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : पाच वर्षांपूर्वी पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून आला नसल्याने सत्तेत वा विरोधी पक्षात नसतानाही उल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने वंचित असणाऱ्या मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधत आहे. मनसेने नुकतीच आयुक्त अजीज शेख यांची भेट घेऊन त्यांचे विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे. शेख यांनी मनसेला प्रतिसाद देताना संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील व तसेच पॅनेल १३ मध्ये पाण्याच्या लाईनीतून मोठ्या प्रमाणात वाढते लिकेज, असंख्य खड्डे, ब्राह्मण पाडा, गणेश सोसायटी १, श्रीकृष्ण कॉलनी आणि ज्योती कॉलनी येथील पाण्याची समस्या, शौचालयांची दुरवस्था आणि पाण्याची समस्या संपुष्टात आणण्यासाठी पॅनेल क्र. १३ मधील वॉटर सप्लाय येथे बांधण्यात आलेली पाण्याची टाकी सुरू करावी आदी मूलभूत सुविधांच्या मुद्द्यांवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त अजीज शेख यांची भेट घेऊन त्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. त्यावर आयुक्त शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ समस्या सोडवण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, शहर संघटक मैनुद्दीन शेख, उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव, सुभाष हटकर, मनविसेचे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, विभाग अध्यक्ष कैलाश वाघ, उपविभाग अध्यक्ष आशीष सोनी, मधुकर बागुल, शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर, अजय बागुल, पंकज राजगुरू आदी उपस्थित होते.