रस्त्यात अडथळा करणाऱ्या रिक्षा, हातगाड्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यात अडथळा करणाऱ्या रिक्षा, हातगाड्यांवर कारवाई
रस्त्यात अडथळा करणाऱ्या रिक्षा, हातगाड्यांवर कारवाई

रस्त्यात अडथळा करणाऱ्या रिक्षा, हातगाड्यांवर कारवाई

sakal_logo
By

भिवंडी, ता. ३० (बातमीदार) : भिवंडी शहर आणि परिसरात पादचाऱ्यांसाठी बनविलेल्या रस्त्यावर अवैधपणे उभ्या राहिलेल्या रिक्षा व हातगाड्यांवर नारपोली पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई केली; मात्र भिवंडी परिमंडळ-२ मधील पाच पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
भिवंडी शहर आणि परिसरात वाहतूक सुरळीत व्हावी आणि पादचाऱ्यांना अडथळा होऊ नये, याकरिता एमएमआरडीएच्या माध्यमातून आरसीसी रस्ते बनविले आहे. तसेच अनेक ठिकाणी शासनाने डांबरी रस्ते बनविले असताना या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रिक्षाचालक व मालकांनी अतिक्रमण करीत स्वयंघोषित रिक्षा स्टॅन्ड बनविले आहेत. प्रवासी मिळविण्यासाठी काही ठिकाणी जाणीवपूर्वक प्रवासी वाहने उभी केली जात आहेत. अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांच्या हातगाड्या या रस्त्यांवर लावल्या जात आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. याची दाखल घेत नारपोली पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन रिक्षा आणि दोन हातगाड्यांवर कारवाई केली आहे. अशा कारवाई भिवंडीतील इतर पाच पोलिस ठाण्यात का केल्या जात नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.