पालिका कामगारावरील हल्ल्याचा निषेध! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका कामगारावरील हल्ल्याचा निषेध!
पालिका कामगारावरील हल्ल्याचा निषेध!

पालिका कामगारावरील हल्ल्याचा निषेध!

sakal_logo
By

चेंबूर, ता. ३० (बातमीदार) ः पालिका एफ उत्तर माटुंगा अंतर्गत असलेली जोगळेकर वाडी पालिका चौकीतील कामगार प्रकाश कांबळे यांच्यावर खासगी ठेकेदारातर्फे चालविण्यात येणाऱ्या क्लीन अप कचरा गाडीवरील चालक व क्लिनर यांनी हल्‍ला केला होता. याचा पालिका कर्मचारीवर्गाच्‍या विविध संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला.
चालक रिझवान शेख व क्लिनर इरफान पठाण अशी पालिका कामगारावरील हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एफ उत्तर माटुंगा अंतर्गत जोगळेकर वाडी या ठिकाणी पालिकेच्‍या घनकचरा व्यवस्थापन कामगारांची चौकी आहे. या चौकीतील कामगार प्रकाश कांबळे कामावर असताना पालिकेत ठेकेदारामार्फत चालविण्यात येणारे क्लीन अप वाहनावरील चालक व क्लिनर यांनी कांबळे यांच्यावर शनिवारी (ता. २९) हल्ला केला तसेच धमकी देऊन पलायन केले.
ही माहिती कामगारांना कळताच त्यांनी जखमी कांबळे यांना उपचाराकरिता सायन रुग्णालयात दाखल केले आहे. पालिका कर्मचारी यांनी माटुंगा पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी शोध घेत आरोपी चालक रिझवान शेख व क्लिनर इरफान पठाण या दोघांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्याचा म्युनसिपल मजदूर संघाचे कामगार नेते प्रकाश जाधव, म्‍युनिसिपल मजदूर युनियनचे उपाध्यक्ष मंगेश पेडामकर, संघटक संदीप मोते, ज्‍येष्ठ चिटणीस संजय कापसे, जी उत्तर अध्यक्ष मनोज सागरे, शक्ती वेल कलवण व कामगार पदाधिकारी यांनी चौकीला भेट देत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.