सराईत चोरटा नालासोपाऱ्यात अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत चोरटा नालासोपाऱ्यात अटक
सराईत चोरटा नालासोपाऱ्यात अटक

सराईत चोरटा नालासोपाऱ्यात अटक

sakal_logo
By

नालासोपारा, ता. ३० (बातमीदार) : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालय हद्दीत घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी करून फरार होणारा सराईत चोरटा नालासोपाऱ्यात अटक करण्यात आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या चोरट्याकडून सव्वा लाख रुपयांचे पाच मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे. तपासात या चोरट्याने घरफोडीचे दोन, जबरी चोरीचे चार आणि वाहनचोरीचा एक अशा सात गुन्ह्यांची कबुली दिल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
नुरउद्दीन ऊर्फ छोटू कमरुद्दीन शेख (वय २२) असे सराईत चोरट्याचे नाव असून हा नालासोपारा पूर्व वाकनपाडा येथील राहणारा आहे. आयुक्तालय परिसरात घरफोडी, वाहनचोरी, जबरी चोरीच्या वाढत्या घटनांवरून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेवरून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय सरक, हवालदार शिवाजी पाटील यांना आरोपी चोरीचा माल नालासोपारा पूर्व येथे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने वाकनपाडा येथे सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पाच मोबाईल, एक दुचाकी असा एक लाख २५ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल आढळला. त्याच्या चौकशीत त्याने पेल्हार ठाण्यातील पाच आणि वालिव ठाण्यातील दोन अशा सात चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.