रिक्षावाल्यांचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षावाल्यांचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ
रिक्षावाल्यांचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

रिक्षावाल्यांचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. ३० (बातमीदार) : रिक्षाला सोळा वर्षे पूर्ण झाली, की आरटीओ नियमानुसार ती रिक्षा स्क्रॅप करून भंगारमध्ये दिली जाते. असा कायदा असताना घणसोली रेल्वे स्टेशनपासून डी मार्टपर्यंत ते पुढे घणसोली गावापर्यंत अशा अनेक रिक्षा फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही धावत आहेत. ट्रॅफिक पोलिस व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करत असतात; तरीही हे रिक्षावाले प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. पोलिस कारवाई करत असताना या रिक्षा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असा सवाल प्रवासी करत आहेत. या रिक्षात बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जर अशा रिक्षातून प्रवास करणे बंद केले, तर या रिक्षा आपोआपच बंद होतील, अशी प्रतिक्रिया संदीप पाटील या रिक्षाचालकाने दिली; तर स्थानिक नियमित प्रवासी सुधीर जाधव म्हणाले की, आम्ही एवढे तज्ज्ञ नाही, की रिक्षा पाहून ती भंगार आहे की नवीन आहे तपासून बसायला. कामावरून सुटलो की ट्रॅफिक, रिक्षा स्टँड, रांग या सर्व गोंधळात रिक्षा तपासणी कधी करणार? हे काम पोलिसांचे आहे. त्यांना त्यासाठीच वेतन मिळते, अशी प्रतिक्रिया काही प्रवासी देत आहेत.