तुर्भे स्टोअर्स परिसरात नवजात मुलीचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुर्भे स्टोअर्स परिसरात नवजात मुलीचा मृतदेह
तुर्भे स्टोअर्स परिसरात नवजात मुलीचा मृतदेह

तुर्भे स्टोअर्स परिसरात नवजात मुलीचा मृतदेह

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : तुर्भे स्टोअर्समधील के. के. आर. रोड भागातील सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात अज्ञात महिलेने दोन दिवसांच्या मृत नवजात मुलीला टाकल्याचे उघडकीस आले आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास शौचालयासाठी गेलेल्या काही व्यक्तींना मृत नवजात मुलगी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेऊन मृत बालिकेला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तिच्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला; मात्र काहीच माहिती न मिळाल्याने अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.