पालघर रेल्वे स्थानकातील लिफ्ट दोन दिवसांपासून बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर रेल्वे स्थानकातील लिफ्ट दोन दिवसांपासून बंद
पालघर रेल्वे स्थानकातील लिफ्ट दोन दिवसांपासून बंद

पालघर रेल्वे स्थानकातील लिफ्ट दोन दिवसांपासून बंद

sakal_logo
By

पालघर, ता. ३० (बातमीदार) : पालघर रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक एकवरील लिफ्ट दोन दिवसांपासून बंद आहे. यामुळे वयोवृद्ध आणि रुग्ण प्रवाशांना फलाट क्रमांक दोन गाठायचा असल्यास पायऱ्या चढाव्या लागत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही लिफ्ट त्वरित सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पालघर रेल्वे स्थानकातील लिफ्ट गेल्या दहा ते बारा दिवसांत दुसऱ्यांदा बंद पडली आहे. विशेष म्हणजे त्याच फलाटावर रेल्वे अधिकाऱ्यांचे कार्यालयसुद्धा आहे; मात्र अधिकारीवर्गसुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. फलाट क्रमांक एकवर लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. लिफ्ट बंद असल्याची तक्रार करण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे स्टेशन कार्यालय गाठल्यावर कार्यालय बंद असल्याचे उत्तर त्यांना देण्यात आले. तसेच तक्रार नोंदवही उपलब्ध होत नसल्याने तक्रार नेमकी कुठे करायची, असा प्रश्न रेल्वे प्रवासी उपस्थित करत आहेत; तर ही लिफ्ट बंद असल्याचा मोठा फटका दिव्यांग प्रवाशांसह, वृद्ध, आजरी व्यक्ती आणि गर्भवतींना बसत आहे. त्यामुळे या लिफ्टची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.