पनवेल-छपरादरम्यान विशेष ट्रेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल-छपरादरम्यान विशेष ट्रेन
पनवेल-छपरादरम्यान विशेष ट्रेन

पनवेल-छपरादरम्यान विशेष ट्रेन

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल आणि छपरादरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीपासून दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०५१९४ विशेष गाडी २ नोव्हेंबरला पनवेल येथून रात्री १०.५० वाजता सुटेल आणि छपरा येथे तिसऱ्‍या दिवशी सकाळी ८.५० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०५१९३ विशेष गाडी १ नोव्हेंबर २०२२ रोजी छपरा येथून दुपारी ३.२० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्या कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, बनारस, वाराणसी, ज्ञानपूर शहर आणि बलिया स्थानकांवर थांबणार आहेत. तसेच या विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण रविवारपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.