श्वानामुळे चोराला पकडण्यात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्वानामुळे चोराला पकडण्यात यश
श्वानामुळे चोराला पकडण्यात यश

श्वानामुळे चोराला पकडण्यात यश

sakal_logo
By

वाशी, (बातमीदार) ः येथील एपीएमसी मार्केटमध्ये भटक्या श्वानामुळे एका चोराला पकडण्यात यश आले आहे. फळ बाजारातील जे- विंगमध्ये काही इसमांकडून संशयास्पद हालचाल होत असल्याची माहिती स्थानिक सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकांसोबत असलेल्या ९ वर्षांच्या श्वानामुळे तीनपैकी एका चोराला पकडण्यात यश आले आहे. तसेच यामुळे मार्केटमधील एका व्यापाऱ्याची ३० हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल फोनच्या चोरीचा सुगावा लागला असल्यामुळे राजाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.