पडघा येथे किल्ले सजावट स्पर्धेला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडघा येथे किल्ले सजावट स्पर्धेला प्रतिसाद
पडघा येथे किल्ले सजावट स्पर्धेला प्रतिसाद

पडघा येथे किल्ले सजावट स्पर्धेला प्रतिसाद

sakal_logo
By

पडघा, ता. ३१ (बातमीदार) : तालुक्यातील पडघा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या किल्ले सजावट स्पर्धेला मुलांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीतील किल्ले सजावट स्पर्धा पार पडली. यावेळी संत सेना महाराज मंडळ यांनी प्रथम सुदर्शन मित्र मंडळ (द्वितीय), हर्ष विजय राऊत (तृतीय), परम समीर बिडवी (उत्तेजनार्थ) क्रमांक पटकाविला. या किल्ले सजावट स्पर्धेत अव्वल ठरलेल्या मंडळ व मुलांना शिवसैनिक अशोक गायकवाड, संजय पटेल, रुपेश कुडुसकर, संतोष बोंडकर, रवी भोईर, सुरेश शिंदे, सुनील गंधे, जयेश क्षीरसागर, मकरंद मेस्त्री, नरेश गायकवाड, प्रदीप भोईर, विजय भोईर यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
----------------------
पडघा : किल्ले सजावट स्पर्धेतील मुलांना पारितोषिक देताना मान्यवर.