प्राण्यांचे शोषण थांबवण्यासाठी जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राण्यांचे शोषण थांबवण्यासाठी जनजागृती
प्राण्यांचे शोषण थांबवण्यासाठी जनजागृती

प्राण्यांचे शोषण थांबवण्यासाठी जनजागृती

sakal_logo
By

वडाळा, ता. ३१ (बातमीदार) ः जागतिक शाकाहारी दिनानिमित्त प्राण्यांचे शोषण थांबवण्यासाठी, काळ्या कपड्यांमध्ये यूएफसीआय (युनायटेड फॉर कंपॅशन इंटरनॅशनल) फाऊंडेशनशी संबंधित वीगन कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. ३०) जुहू बीचवर जनजागृती केली आणि लोकांना त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित केले.
यूएफसीआय फाऊंडेशनच्या संस्थापक, वीगन कार्यकर्त्या श्वेता सावला आणि सुमारे ५० वीगन कार्यकर्ते जुहू बीचवर लोकांना जागरूक करण्यासाठी लॅपटॉप, टॅब्लेट, फोन आणि हातातील फलकांमधून संदेश देत होते. तसेच तबेला, अंडी हॅचरी केंद्रे आणि कत्तलखान्यातील प्राण्यांच्या भयानकतेचे व्हिडीओ देखील दाखवीत होते.
या दरम्यान लोकांना शाकाहारी जीवनशैलीचा अवलंब करून प्राण्यांच्या शोषणापासून दूर जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. कोणत्याही प्राण्यांच्या उत्पादनांचा वापर, प्राण्यांवर चाचणी केलेल्या सौंदर्यप्रसाधने आणि इतर उत्पादनांवर बहिष्कार टाकणे, प्राण्यांच्या कातड्यांशिवाय फॅशन निवडणे, प्राण्यांच्या सर्कस आणि प्राणिसंग्रहालयांवर बंदी घालणे, पाळीव प्राणी विकत घेण्याऐवजी दत्तक घेणे, असे संदेश यावेळी देण्यात आले.

अनेक भारतीय पदार्थ पूर्णपणे शाकाहारी आहेत. एकदा तुम्ही त्या मानसिकतेत आलात की, कोणालाही शाकाहारी बनणे सोपे जाते. आपल्यासारख्याच वेदना आणि दु:ख अनुभवणाऱ्या प्राण्यांचे दुःख समजून घ्या.
- प्रिया मलायत, कार्यकर्त्या

लोकांना त्यांच्या दयाळू स्वभावाला जागृत करण्याचा प्रयत्‍न केला. तसेच सर्कस, प्राणिसंग्रहालय आणि घोडेस्वारी यांसारख्या प्राण्यांचा वापर करणाऱ्या कोणत्याही उद्योगाला पाठिंबा देऊ नका, असे आवाहन केले.
- उत्कर्ष छेडा, कार्यकर्ते