भात पिकाच्या संरक्षणासाठी बुजगावण्याचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात पिकाच्या संरक्षणासाठी बुजगावण्याचा आधार
भात पिकाच्या संरक्षणासाठी बुजगावण्याचा आधार

भात पिकाच्या संरक्षणासाठी बुजगावण्याचा आधार

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ३१ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकवलेले भात पीक मोठ्या जोमात बहरले आहे. दाणे भरणीच्या काळात व भात कापणीच्या काळात पोपट व इतर पक्ष्यांच्या उपद्रवाने भात पिकाचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भात पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध युक्‍त्या वापरून पिकांची निगा राखत आहेत. यासाठी पारंपरिक बुजगावणे फायदेशीर ठरत आहे.
तालुक्यातील वसुरी, हातणे, ओंदे या भागांतील शेतकऱ्यांचे हे खरीप हंगामात येणारे भातपीक शेतकऱ्यांचे वर्षभराचे उत्पादनाचे साधन आहे. विक्रमगड परिसरात कित्येक शेतकरी भात मोठ्या प्रमाणात उत्पादन करत असतात. सध्या मोठ्या जोमात उभ्या असलेल्या भात पिकाला वाढ होऊन दाणे भरण्याचा काळ सुरू आहे. त्यातच आता पक्ष्यांकडून भात पिकाचे नुकसान होत असून पक्षी दाणे खाण्यासाठी भाताच्या धान्यावर ताव मारत असतात. त्यामुळे पक्ष्यांपासून आपल्या तोंडाला आलेला घास हिरावून घेतला जाऊ नये म्हणून शेतकरी भात पिकामध्ये मानवी पुतळ्याच्या आकाराचे बुजगावणे उभारत आहेतड; तर कित्येक ठिकाणी पक्ष्यांना घाबरवण्यासाठी झाडाला प्लास्टिकच्या पिशव्या बांधून उपाययोजना करत असतात. त्यामुळे महत्त्वाचे असलेले भात पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध युक्‍त्या वापरून पिकाची निगा राखत असल्याचे चित्र ग्रामीण भागामध्ये पाहावयास मिळत आहे.