कासा येथे एकात्मता दौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा येथे एकात्मता दौड
कासा येथे एकात्मता दौड

कासा येथे एकात्मता दौड

sakal_logo
By

कासा, ता. ३१ (बातमीदार) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पालघर जिल्ह्यात ३१ ऑक्टोबरला सकाळी एकात्मता दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डहाणू तालुक्यातील तहसीलदार कार्यालय व अनेक ग्रामपंचायत हद्दीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महसूल कर्मचारी, स्थानिक पोलिस आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कासा येथेही यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी कासा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी श्रीकांत शिंदे, महसूल विभागाचे हरिश्चंद्र भरसट, तलाठी नीलेश भसरा, तसेच गावातील नागरिक व तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. या वेळी आचार्य भिसे विद्यालयाच्या मैदानावर तीन किमीची दौड आयोजित करण्यात आली होती.