तिरंदाजी स्पर्धेत ठाणेकरांची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरंदाजी स्पर्धेत ठाणेकरांची बाजी
तिरंदाजी स्पर्धेत ठाणेकरांची बाजी

तिरंदाजी स्पर्धेत ठाणेकरांची बाजी

sakal_logo
By

ठाणे, ता. ३१ (बातमीदार) : वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र आयोजित प्रांतस्तरीय एकलव्य खेलकूद स्पर्धा २०२२ ठाण्यातील थिराणी शाळेत पार पडल्या. जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या जनजाती समाजाच्या तब्बल १४५ खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. यावेळी खो-खो व तिरंदाजी या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ठाणे, कुलाबा, पालघर, शहापूर, रायगड येथून आलेल्या सर्व खेळाडूंनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. तिरंदाजी स्पर्धेत ठाणे; तर खो-खोमध्ये रायगड, पालघर व शहापूर येथील मुला-मुलींनी बाजी मारली. या प्रांतस्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या संघाना व खेळाडूंना २८ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२३ मध्ये गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.