कल्याण येथे छट पूजा उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण येथे छट पूजा उत्साहात साजरी
कल्याण येथे छट पूजा उत्साहात साजरी

कल्याण येथे छट पूजा उत्साहात साजरी

sakal_logo
By

कल्याण, ता. ३१ (बातमीदार) : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने कल्याण पूर्वेत विठ्ठलवाडी स्टेशनसमोरील मैदानात, तसेच चिंचपाडा येथील हेरिटेज शाळेच्या बाजूला आयोजित करण्यात आलेल्या पवित्र छटपूजा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमस्थळी आमदार गायकवाड यांनी भेट देऊन नागरिकांना छटपूजेच्या शुभेच्छा दिल्या.
कल्याण पूर्वेत भाजप कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्यातर्फे गावदेवी मंदिराजवळ तिसगाव येथे तसेच आदर्श छट समिती संस्था, नांदिवली यांच्यातर्फे नांदिवली तलाव येथे आयोजित करण्यात आलेल्या पवित्र छटपूजा कार्यक्रमस्थळीही नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी जमलेल्या हजारो उत्तर भारतीय बंधू-भगिनींना छटपूजेच्या पावन पर्वाच्या राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.