भात खरेदी नोंदणीस मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात खरेदी नोंदणीस मुदतवाढ
भात खरेदी नोंदणीस मुदतवाढ

भात खरेदी नोंदणीस मुदतवाढ

sakal_logo
By

कासा, ता. ३१ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महांमडळामार्फत २०२२-२३ या वर्षासाठी भात खरेदी योजनेसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीचे काम सुरू आहे, पण त्यास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी नोंदणीसाठी आता १० नोहेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भात खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करीत आहेत. दुसरीकडे कासा परिसरात ४७८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, असे कासा आदिवासी भात खरेदी केंद्रातर्फे सांगण्यात आले.