कळव्यात स्लॅब कोसळून दोघे गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळव्यात स्लॅब कोसळून दोघे गंभीर
कळव्यात स्लॅब कोसळून दोघे गंभीर

कळव्यात स्लॅब कोसळून दोघे गंभीर

sakal_logo
By

कळवा, ता. ३१ (बातमीदार) : ठाण्यातील कळवा परिसरातील एका जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब तळमजल्यावरील सलूनवर कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. जखमींवर कळव्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कळव्यातील मनीषानगरमधील तरण तलावाजवळ विक्रांत ही ३८ वर्षे जुनी इमारत असून सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील रूम क्रमांक १०६ चा स्लॅब अचानक तळ मजल्यावर असलेल्या मालक हसन सलमानी हकीम यांच्या ग्लोबल ब्युटी सलून या दुकानावर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत तिघे जण जखमी झाले. खबरदारीचा उपाय म्हणून कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशाने इमारतीच्‍या तळ मजल्यावरील सहा दुकाने बंद करण्यात आली असून इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.