पालघर जिल्हा परिषदमध्ये वल्लभभाई पटेल जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्हा परिषदमध्ये वल्लभभाई पटेल जयंती
पालघर जिल्हा परिषदमध्ये वल्लभभाई पटेल जयंती

पालघर जिल्हा परिषदमध्ये वल्लभभाई पटेल जयंती

sakal_logo
By

पालघर, ता. ३१ (बातमीदार) : जिल्हा परिषद पालघर येथे सोमवारी (ता. ३१) माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्न खिल्लारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता नितीन भोये, जिल्हा कृषी अधिकारी सूरज जगताप, तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय व नगर परिषद पालघर यांच्या विद्यमाने राष्ट्रीय एकता दिवस म्हणून एकता दौडचे आयोजन पालघर येथील हुतात्मा चौकात करण्यात आले होते.
या एकता दौडमध्ये शालेय विद्यार्थी, नागरिक, पोलिस सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, उपविभागीय महसूल अधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास होनमाने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पवार पाटील उपस्थित होते.