मिरा-भाईंदर महानगरपालिकेची मानवी एकता साखळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदर महानगरपालिकेची मानवी एकता साखळी
मिरा-भाईंदर महानगरपालिकेची मानवी एकता साखळी

मिरा-भाईंदर महानगरपालिकेची मानवी एकता साखळी

sakal_logo
By

भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मिरा-भाईंदर महापालिकेने मानवी एकता साखळीचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त रवी पवार, शहर अभियंता दीपक खांबित तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून यावेळी राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी मिरा-भाईंदर महापालिका कार्यक्षेत्रात करण्यात येणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर मिरा-भाईंदर महापालिका मुख्य कार्यालयापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर लांबीची मानवी एकता साखळी तयार करून शहरातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेबाबत जनजागृती करण्यात आली.