उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे एकता दौडचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे एकता दौडचे आयोजन
उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे एकता दौडचे आयोजन

उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे एकता दौडचे आयोजन

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ३१ (वार्ताहर) : सांस्कृतिक मंत्रालय व महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता दौडमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
उल्हासनगर महानगरपालिकाचे प्रशासक तथा आयुक्त अजिज शेख यांच्या नेतृत्त्वाखाली महानगरपालिका मुख्यालय ते गोल मैदानपर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त (सेवा) डॉ. करुणा जुईकर, उपआयुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पगारे, पालिका सचिव प्रतिभा कुलकर्णी, प्रभाग अधिकारी अजित गोवारी, सिस्टीम मॅनेजर श्रद्धा बाविस्कर, भांडार विभागप्रमुख अंकुश कदम, अग्निशमन दल, सुरक्षा विभागाचे मुख्य अधिकारी बाळासाहेब नेटके, पालिका विद्युत विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता हनुमंत खरात, मालमत्ता विभागाचे राजेश घनघाव, पर्यावरण विभागाच्या विशाखा सावंत, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या संजीवनी अमृतसासगर आदी अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दल, सुरक्षारक्षक सहभागी झाले होते.