कळंबोलीतून एक लाख ७० हजारांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबोलीतून एक लाख ७० हजारांचा गुटखा जप्त
कळंबोलीतून एक लाख ७० हजारांचा गुटखा जप्त

कळंबोलीतून एक लाख ७० हजारांचा गुटखा जप्त

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ३१ (वार्ताहर) ः कळंबोली रोडपाली येथील एका घरातून एक लाख ७१ हजारांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
नवी मुंबई अमली पदार्थ व प्रतिबंधित गुटखा विक्रीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी विशेष मेाहीम सुरू केली आहे. त्याअनुषंगाने विविध ठिकाणी शोधमोहीम हाती घेण्यात आली असून शनिवारी (ता. २९) कळंबोली पोलिस ठाणे हद्दीतील काळूबाळू नगर सेक्टर १५ रोडपाली येथे रूम क्रमांक आठमधून १,७१,४८८ रुपयांचा प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चित्तरंजन बारीक (वय २३) याच्यावर कळंबोली पोलिस ठाण्यात गुरनं २१८/२०२२ भादंवि कलम ३२८, २७२, २७३, १८८ सह अन्न सुरक्षा मानके कायदा कलम २६, २७, ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.