घाटकोपरमध्ये मराठी हिंदी कवितांची मुक्त मैफल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटकोपरमध्ये मराठी हिंदी कवितांची मुक्त मैफल
घाटकोपरमध्ये मराठी हिंदी कवितांची मुक्त मैफल

घाटकोपरमध्ये मराठी हिंदी कवितांची मुक्त मैफल

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) ः स्थानिक व नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या संकल्पनेतून ‘कवितेच्या नावानं चांगभलं’ या उपक्रमाचे दुसरे पर्व नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, आनंद नगर येथे रविवारी पार पडले. युवा कवी विष्णू थोरात, संजय वाव्हळ, मयूर कदम यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ गझलकार स्वर्गीय इलाही जमादार आणि राहत इंदोरी यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला. ‘कवितेच्या नावानं चांगभलं’ चे पहिले पर्व २०२० मध्ये पार पडले. या कार्यक्रमाला मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली आणि पुणे येथून कवींनी उपस्थिती दर्शवली. उपस्थित कवींनी आपल्या हिंदी व मराठी कविता आणि गझल सादर केल्या. दरम्यान, या वेळी सुनील उपाध्याय यांनी राहत इंदोरी यांना; तर विष्णू थोरात यांनी इलाही जमादार यांना समर्पित रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी प्रतीक कांबळे आणि कवयित्री वेदिका यांनी केले.