अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियान
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियान

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियान

sakal_logo
By

विरार, ता. २ (बातमीदार) : अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे फिट इंडिया अभियान व स्वच्छता मोहीम या उपक्रमांतर्गत वसई किल्ला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाने फिट इंडिया अभियान तसेच स्वच्छता मोहीम हे उपक्रम हाती घेतले आहेत. यानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाने वसई किल्ला व नरवीर चिमाजी अप्पा स्मारकास भेट देऊन तिथे विविध व्यायाम प्रकार करून शारीरिक आरोग्य सुदृढ राखण्याविषयी जनजागृती केली.
वसई किल्ल्यामध्ये स्वयंसेवकांनी धावणे, योगासने, कवायत असे व्यायामप्रकार करून शारीरिक स्वास्थ्य टिकवण्याबाबत जनजागृती केली. तसेच रासेयो स्वयंसेवकांनी किल्ला स्वच्छता मोहीम राबवली. वसई किल्ल्यातील प्लास्टिकचा कचरा गोळा करून स्वयंसेवकांनी किल्ल्याच्या स्वच्छतेस हातभार लावला.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. शत्रुघ्न फड, प्रा. आदिती यादव व रासेयो सल्लागार समितीच्या सदस्या प्रा. ज्योती ठाणकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी इंदू माळी व माजी विद्यार्थी प्रतिनिधी शुभम राय यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.