छट पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छट पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांची हजेरी
छट पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांची हजेरी

छट पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांची हजेरी

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) ः उत्तर भारतीय अत्यंत धार्मिक आस्थेने छटपूजा उत्सव साजरा करतात. चांदिवलीतील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून कुर्ला शीतल तलावाशेजारी आणि काजूपाडा शिवाजी विद्यालय मैदान येथे भव्य छटपूजाचे आयोजन करण्यात आले होते. दिलीप लांडे यांच्या या छटपूजेला विभागातील उत्तर भारतीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्‍हणजे या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील छटपूजेला हजेरी लावून छटमातेचे दर्शन घेतले. त्‍यानंतर ते पवई येथील छटपूजेला गेले. याप्रसंगी आमदार राजहंस सिंह, शाखाप्रमुख नितीन गोखले, शैलेश निंबाळकर, सुरेंद्र मोरे, सुशील जाधव, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयाग लांडे, शिवसैनिक प्रणव लांडे व उत्तर भारतीय संघ चांदिवलीचे पदाधिकारी रामप्रसिद्ध दुबे भास्कर सिंह, मदनलाल यादव, संदीप दुबे, पंकज पांडे आदी उपस्थित होते.