स्वखर्चाने बुजवले खड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वखर्चाने बुजवले खड्डे
स्वखर्चाने बुजवले खड्डे

स्वखर्चाने बुजवले खड्डे

sakal_logo
By

मुरबाड, ता. ३१ (बातमीदार) : कल्याण-माळशेज घाट महामार्गावर वैशाखरे गावाजवळील नदीच्या पुलावर गेले अनेक दिवस खड्डे पडले आहेत. या खड्ड्यावर आदळून अनेक दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत. या खड्ड्यात आदळून कार पुलावरून नदीत कोसळली होती, परंतु राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी अधिकारी, प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे सोमवारी वैशाखरे गावातील समाजसेवक वसंत देशमुख यांनी स्वखर्चाने हे सर्व खड्डे बुजवले.