मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी संजय मांजरेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी संजय मांजरेकर
मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी संजय मांजरेकर

मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी संजय मांजरेकर

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी संजय मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार हेमंत परब यांनी मांजरेकर यांच्याकडे आज सुपूर्द केला. गेली ३३ वर्षे हेमंत परब हे अग्निशमन दलाच्या सेवेत कार्यरत होते. सहाय्यक अग्निशमन अधिकारी ते प्रमुख अग्निशमन अधिकारी पदापर्यंतची धुरा परब यांनी सांभाळली. त्यांनी १७ महिने प्रमुख अग्निशमन अधिकारी पद भूषविले. प्रमुख अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणारे संजय मांजरेकर हे देखील गेली ३३ वर्षे मुंबई अग्निशमन दलाच्या सेवेत कार्यरत आहेत.